R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय, कोरोनानं पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची फी माफ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय, कोरोनानं पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची फी माफ

 

पुणे | कोरोनाच्या संसर्गामध्ये अनेकांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तींना गमावलं आहे. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि मुंबई विद्यापीठापाठोपाठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं फी कपातीचा निर्णय जाहीर केला आहे. तर, कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांनी पालक गमावले आहेत त्यांची २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी फी कपातीचा निर्णय व्यवस्थापन परिषदेत घेण्यात आला आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळं विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठांना फी कपातीसंदर्भात आवाहन केलं होतं. उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं कोरोना विषाणू संसर्गामुळे ज्या विद्यार्थ्यांनी त्यांची आई किंवा वडील या दोघांपैकी आणि दोन्ही पालक गमावले आहेत त्यांना १०० टक्के फी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र हा निर्णय शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी लागू असणार आहे.

याच पार्श्वभूमीवर ग्रंथालय फी, प्रयोगशाळा फी, जिमखाना फी, एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिविटी, कॉम्प्युटर फॅसिलिटी फीमध्ये ५० टक्के कपात करण्यात आली आहे. तर, विद्यार्थी कल्याण फीमध्ये ७५ टक्के कपात करण्यात आलीय. परीक्षा फी, विकास निधीमध्ये २५ टक्के कपात करण्यात आली आहे. तर औद्योगिक भेट, महाविद्यालय वार्षिक नियतकालिक फी, प्रयोगशाळा अनामत, सी. एम. डिपॉझिट, इतर फी, आरोग्य तपासणी फी, आपत्ती व्यवस्थापन फी आणि अश्वमेध फीमध्ये १०० टक्के कपात केली आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments