R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home बॉलिवूड अभिनेत्री श्वेता तिवारीला पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी केले ट्रोल

अभिनेत्री श्वेता तिवारीला पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी केले ट्रोल

 

मुंबई | अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मिडीयावर तिच्या पोस्टमुळे कायम चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिच्या दुसऱ्या पतीने तिच्यावर लगावलेल्या आरोपांमुळे ती जास्तच चर्चेत आली होती, पण आता श्वेता एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा श्वेताला तिच्या सोशल मीडियाच्या पोस्ट वरून ट्रोल केलं आहे.

श्वेताने तिच्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, त्याच्यासोबत फोटो शेअर केला होता. श्वेताच्या या मित्राचे नाव विकास कलंत्री आहे. श्वेताने विकाससोबत जुने फोटो शेअर करत त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली होती. फोटो शेअर करत भावूक होऊन श्वेताने कॅप्शनमध्ये लिहिलं, त्यामुळे तिला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे.

‘जेव्हा मला बोलावसं वाटतं तू ऐकतोस.जेव्हा मला वाट चुकल्यासारख वाटतं तेव्हा तू मला मार्गदर्शन करतोस. जेव्हा मी कोणत्या संभ्रमात असते त्यावेळी तू माझा आत्मविश्वास वाढवतोस. जेव्हा मला एखाद्यावर पुन्हा विश्वास ठेवायला शिकायचं होतं तेव्हा तू ते सिध्द करून दाखवलं की मी ते करू शकते. आणि याच कारणामुळे मी तुझ्यावर खूप प्रेम करते. माझ्या या गोड मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा’ असा खास कॅप्शन श्वेताने लिहिला होता.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘मी चांगला वडील नाही’, आर्यनच्या प्रकरणानंतर शाहरुख खानने व्यक्त केली खंत

  अभिनेता शाहरुख गेल्या काही दिवसांपासून पुत्रआर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणामुळे खूप चर्चेत आला आहे. गुरूवारी झालेल्या सुनावणीनंतर आर्यनला आता आणखी पाच दिवस तुरूंगात राहावे लागणार...

एनसीबी’ने निर्माता इम्तियाज खत्रीच्या घरी केली छापेमारी, कार्यालयाची घेतली झाडाझडती !

  मुंबई | क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात एनसीबीने अनेक ठिकाणी छापेमारी करत आहे. एनसीबी'ने आता चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीच्या बांद्रा येथील घरावर आणि कार्यालयावर छापा...

आर्यनच्या अटकेनंतर बहीण सुहाना खान हिने ट्रोलिंगपासून वाचण्यासाठी लढवली ही शक्कल

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडीत पाठवण्यात आले आहे. एनसीबीने आर्यनला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावरील...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments