R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या आघाडी सरकार जाणार हे फडणवीसांचे दिवा स्वप्न, बाळासाहेब थोरात यांनी लगावला टोला

आघाडी सरकार जाणार हे फडणवीसांचे दिवा स्वप्न, बाळासाहेब थोरात यांनी लगावला टोला

 

महाराष्ट्रातील भाजपचे चार केंद्रीय नेते सोमवारपासून महाराष्ट्रभर जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत. यामध्ये अनेक भागात नव्यानं झालेले केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या यात्रेचं नियोजन केले. लोकांशी संवाद साधण्यासोबतच केंद्रातील योजनांची माहिती देखील ते जनतेला देणार आहेत. त्यातच आज पासून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जन आशीर्वाद दौरा मुंबईतून सुरु झाला आहे. या दौऱ्यात विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस सुद्धा सामील झाले आहे.

यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद सद्धताना फडणीवसांनी पुन्हा एकदा आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. लवकरच आघाडी सरकार आपल्या कर्माने पडेल असे विधान फडणवीसांनी केले होते. आता या विधानाचा काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

भाजपची जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. जनतेला प्रश्न पडेल, यांना कशाला आशीर्वाद हवा आहे? अनेक नैसर्गिक संकटामध्ये सरकारने जे काम केलं, त्याचे कौतुक सगळीकडे सुरुये. यूपी मध्ये काय झालं? त्यांनी आशीर्वाद मागण्याचा अधिकार देशात नाही राज्यात तर नाही. देवेंद्र जी म्हणाले, आमचा डीएनए विरोधी पक्षाचा आहे, त्यामुळे विरोधी पक्षाचे ते काम करत आहेत. हे सरकार आज जाईल उद्या जाईल हे दिवा स्वप्न बघत आहेत, आता दोन वर्षे पूर्ण होतील, पुन्हा होणाऱ्या निवडणूक एकत्र लढू आणि हे सरकार परत येईल. सरकार काम करत आहे, सरकारवर टीका करायला सोय‌ नाही म्हणून मुख्यमंत्र्यांवर टीका केली जातेय, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

Recent Comments