R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "छत्रपतींना स्वकीयांकडून त्रास झाला, तसा मला झाला" आशाताई बुचके यांचा सेनेवर गंभीर...

“छत्रपतींना स्वकीयांकडून त्रास झाला, तसा मला झाला” आशाताई बुचके यांचा सेनेवर गंभीर आरोप

 

महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि भाजप अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप करताना तसेच कुरघोडी करताना पाहायला मिळत आहे. राज्यात महापालिकांच्या निवडणुका जवळ येतील, तसे हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

त्यातच पुणे जिल्ह्यातील एका शिवसेनेच्या नेत्याने पक्षाला जय महाराष्ट्र करत मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना, मला परकियांनी पराजित केलं नाही. मला स्वकीयांनीच पराजित केलं, छत्रपतींना जसा स्वकीयांकडून त्रास झाला तसाच मलाही झाला, असा आरोप केला.
आशा बुचके यांनी मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यश चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. भाजपचा पुणे जिल्ह्यात शिवसेनेला हा जोरदार झटका मानला जात आहे.

यावेळी आशा बुचके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शिवसेना पक्षाचा विश्वास विसरु शकत नाही. पण न्याय देत असताना ज्यावेळी माझ्यासारख्या महिलेची काहींच्या सांगण्याने पक्षातून हकालपट्टी होते. मात्र या संकटात कार्यकर्त्यांनी माझी पाठ सोडली नाही, असे सांगत बुचके यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

Recent Comments