R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या पूरग्रस्त भागांचे मंगळवारपर्यंत पंचनामे पूर्ण होणार, पूरग्रस्त नागरिकांच्या खात्यावर मदत पोहोचवणार

पूरग्रस्त भागांचे मंगळवारपर्यंत पंचनामे पूर्ण होणार, पूरग्रस्त नागरिकांच्या खात्यावर मदत पोहोचवणार

 

कोल्हापूर | जिल्ह्यात आलेल्या महापुराचे पंचनामे येत्या मंगळवारपर्यंत पूर्ण होतील. यानंतर राज्य शासनाकडून आलेली मदत पूरग्रस्तांच्या थेट खात्यावर जमा करून पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

सन २०१९ नंतर यंदाही जिल्ह्याला महापुराचा प्रचंड फटका बसला. या रेकॉर्डब्रेक अतिवृष्टी व महापुरामुळे जिह्यातील सुमारे ८० गावांना पाण्याचा वेढा पडला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त गावांना भेट देऊन पूरग्रस्तांना दिलासा दिला होता.

महापुरामुळे विस्कळीत झालेले जनजीवन आता पूर्वपदावर येत असून, बहुतांश पूरग्रस्त भागात नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांनीही पूरग्रस्त भागात पाहणी करून पूरग्रस्तांना धीर देत पुनर्वसन करण्याची ग्वाही दिली आहे.

दरम्यान, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाकडून जिह्यासाठी 17 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. पूरग्रस्त भागांचे पंचनामे मंगळवारपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. यानंतर राज्य शासनाकडून प्राप्त झालेली 17 कोटी रुपयांची मदत पूरग्रस्तांच्या थेट खात्यावर जमा करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

 

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

Recent Comments