R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ठाकरे सरकारचा निर्णय बीडीडी पुनर्विकासात पोलिसांना ५०० चौरस फुटांचे घर

ठाकरे सरकारचा निर्णय बीडीडी पुनर्विकासात पोलिसांना ५०० चौरस फुटांचे घर

 

मुंबई | बीडीडी चाळींमध्ये वास्तव्याला असलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी ठाकरे सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. या चाळींचा पुनर्विकास करताना चाळींमध्ये वास्तव्याला असलेल्या पोलिसांना पाचशे चौरस फुटांचे घर मालकी तत्त्वावर मिळणार आहे. नव्या पुनर्विकसित घरांच्या बांधकामाचा खर्च फक्त पोलिसांना भरावा लागेल.

या चाळींच्या पुनर्विकासाची महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारने आखली आहे. या चाळींमधील काही घरे सरकारी कर्मचाऱयांना सेवा निवासस्थाने (सर्व्हिस क्वॉटर्स) म्हणून दिली आहेत. त्यात पोलीस कर्मचाऱयांनाही बीडीडी चाळींमध्ये सेवा निवासस्थाने दिलेली आहेत. या चाळींमध्ये काही पोलीस कुटुंबीय दोन-तीन पिढय़ांपासून वास्तव्याला आहेत. पोलिसांची संख्या व उपलब्ध निवासस्थानांचे प्रमाण व्यस्त आहेत. त्यामुळे पोलिसांच्या घरांचा प्रश्न जटील झाला आहे.

राज्यात कोणतीही आपत्ती किंवा संकट आल्यास सर्वप्रथम पोलीस धावून जातात. त्यामुळे बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात पोलिसांना कायमस्वरुपी घरे देण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने सकारात्मक अहवाल सादर केला व जुलै महिन्यात झालेल्या या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments