R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा घेत छोट्या शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढवावे केंद्रीय मंत्री कपिल...

केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा घेत छोट्या शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढवावे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे आवाहन

 

मोदी सरकारने छोट्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना आखल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन छोट्या शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न वाढवावे असे आवाहन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी गुरुवारी जन आशीर्वाद यात्रेत विविध ठिकाणी बोलताना केले.

मुरबाड शहरात शेतकरी, आदिवासी आणि व्यापाऱ्यांनी तसेच विविध सामाजिक संघटनांनी त्यांना निवेदने दिली. श्री. पाटील यांनी यावेळी स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या. कल्याण मुरबाड रेल्वे मार्गाच्या मागणीसंदर्भात आपण व्यक्तिगत लक्ष घालू असे आश्वासन श्री. पाटील यांनी दिले.

शिवले गावात वारकऱ्यांचा आणि केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. चंदूदादा सेंद्रीय शेतकरी उत्पादक गट कंपनीच्या भाजीपाला स्टॉलचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. कपिल पाटील यांनी या स्टॉलधारक शेतकऱ्यांना केंद्रीय योजनांची माहिती देण्याचे निर्देश स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांना दिले.

सरळगाव, किन्हवली येथे चौक सभेत त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांचा व शेतकऱ्यांचा श्री. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वडवली येथे त्यांनी मासेमारीसाठी हाताने जाळे व पागे विणणाऱ्या कारागिरांशी संवाद साधला. राज्यातील हे एकमेव गाव आहे जिथे ही जाळी हाताने विणली जातात. या कारागिरांनी मांडलेल्या प्रश्नात आपण लक्ष घालू असेही त्यांनी सांगितले. सापगाव येथेही त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments