R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या " माझं मंत्रिपद जाणार म्हणून काही जणांना गुदगुल्या झाल्या तर काही खुशीत...

” माझं मंत्रिपद जाणार म्हणून काही जणांना गुदगुल्या झाल्या तर काही खुशीत होते” – रावसाहेब दानवे

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्री मंडळाच्या विस्तारात अनेक जुन्या केंद्रीय मंत्र्यांना डच्चू देण्यात आला होता. तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना सुद्धा बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल अशी चर्चा प्रसार माध्यमांवर रंगताना दिसून आली होती. मात्र त्या उलट पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. याच पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच दानवे यांनी भाष्य करत विरोधकांना टोला लगावला होता.

35 वर्ष मला जालना जिल्ह्यातील मतदारांनी खासदार केले म्हणून आज केंद्रीय रेल्वे मंत्री झालो, आणि हे झाले नसतो तर जवखेड्याच्या मारुतीच्या पारावर हरिपाठ करत बसलो असतो, असं रावसाहेब दानवे म्हणाले. इतकंच नाही तर मतदाराच्या हातात आमच्या पतंगाचा दोरा आहे, असंही ते म्हणाले.

केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांची मांडव परतनी झाली हनिमून बी होऊन जाईल, अशी टोलेबाजी रावसाहेब दानवे यांनी केली. मात्र, भागवत कराड हे पहिल्या वेळेस मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रात आल्यानं मांडव परतनी हा शब्द वापरल्याचं दानवे म्हणाले. माझे मंत्रीपद जाणार म्हणून काही जणांना आनंद तर काही जणांना गुदगुल्या झाल्या होत्या, असा टोलाही दानवे यांनी आपल्या विरोधकांना लगावला.

 

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments