R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति संजय राऊत म्हणाले, कोण राणे माहित नाहीत, तर राणे म्हणतात की

संजय राऊत म्हणाले, कोण राणे माहित नाहीत, तर राणे म्हणतात की

 

कोण नारायण राणे? यावर मला माहित नाही. आमचे शाखा प्रमुख किंवा आमदार यावर बोलतील. अतिशय स्थानिक विषय हा आहे, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेवर भाष्य केलं. मुंबईत पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी यावर भाष्य केले होते. यावर आता नारायण राणे यांनी भाष्य करत राऊत यांना टोला लगावला आहे.

मी ओळख करुन देईन, जवळ बोलवेन आणि ओळख करुन देईन असं नारायण राणे म्हणाले. नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. या यात्रेदरम्यान त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर शिवसैनिकांनी स्मृतीस्थळावर जाऊन गोमूत्र शिंपडून ती जागा पुन्हा ‘पवित्र’ केली. यावरून राजकारण चांगलेच तापू लागले होते, यावरून सेवना आणि भाजपा आमने-सामने उभी राहिली होती.

तसेच आज होणाऱ्या सोनिया गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीवर भाष्य करताना राऊत म्हणाले की,देशातील मुख्य विरोधीपक्षाच्या नेत्यांची बैठक आहे. जे पक्ष राज्य स्तरावर विरोधी पक्षात काम करत आहेत, त्या मुख्यमंत्र्यांची आज बैठक आहे. देशापुढे अनेक प्रश्न आहेत. पेगॅसस ते महागाई यासारख्या अनेक विषयावर चर्चा होणार आहे. या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, झारखंड,केरळ ,छत्तीसगडचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

कसलीही चौकशी लावा, मी घाबरत नाही-शशिकांत शिंदे

  सध्या राज्यात अनेक नेत्यांवर ईडीची कारवाई करण्यात येत आहे. तसेच अनेक मंत्र्यांवर सुद्धा सुरक्षा यंत्रणेच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागला आहे. याचं पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात...

राज ठाकरे यांचं हिंदुत्व बेगडी आहे, हे दाखवून दिलंय” शिवसेना खासदार विनायक राऊत यांची घणाघाती टीका

  दोनच दिवसांपूर्वी साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. या भेटीनंतर माँ कांचनगिरी यांनी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

Recent Comments