R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या शिवसैनिकांची कृती म्हणजे एक प्रकारे बुरसटलेला तालिबानी विचार - देवेंद्र फडणवीस

शिवसैनिकांची कृती म्हणजे एक प्रकारे बुरसटलेला तालिबानी विचार – देवेंद्र फडणवीस

 

नागपूर | केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यांची जनआशीर्वाद यात्रा मुंबईतून सुरू झाली. केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांनी दादर येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. यानंतर शिवसैनिकांनी त्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केल्याचे सांगितले जात आहे. यावरून भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षावर जोरदार घणाघात केला आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण करणाऱ्या शिवसैनिकांची कृती म्हणजे एकप्रकारे बुरसटलेली तालिबानी मानसिकता आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. ज्या लोकांनी हे केले असेल, त्यांना बाळासाहेबांची शिवसेना समजलीच नाही. ही अतिशय संकुचित मानसिकता आहे, एक प्रकारे बुरसटलेला तालिबानी विचार आहे. अशा प्रकारे वागणे हे योग्य नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही, या शब्दांत फडणवीस यांनी या कृतीवर निशाणा साधला.

ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये घालण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता आणि बाळासाहेबांवर श्रद्धा ठेऊन त्यांच्या समाधीवर कुणी जात असेल, तर ती समाधी अपवित्र झाली असे सांगता. ही कृती अतिशय अयोग्य आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. आता फडणवीसांच्या या टीकेला शविसेना काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

Recent Comments