R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या तुमच्या डोक्यावर कोण तरी बसलंय हे लक्षात ठेवा -नारायण राणे

तुमच्या डोक्यावर कोण तरी बसलंय हे लक्षात ठेवा -नारायण राणे

 

महाराष्ट्रातील भाजपचे चार केंद्रीय नेते सोमवारपासून महाराष्ट्रभर जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत. यामध्ये अनेक भागात नव्यानं झालेले केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या यात्रेचं नियोजन केले. लोकांशी संवाद साधण्यासोबतच केंद्रातील योजनांची माहिती देखील ते जनतेला देणार आहेत. त्यातच गुरुवारपासून पासून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जन आशीर्वाद दौरा मुंबईतून सुरु झाला असून आज दौऱ्याचा दुसरा दिवस आहे आहे. मात्र या जन आशिर्वात यंत्रावर स्थानिक पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यात रॅलीतील अनेक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यावरूनही नारायण राणे यांनी आघाडी सरकारवर टीका केली.

मला काही फरक पडत नाही. 7 गुन्हे दाखल करा, ७० करा की ७० हजार गुन्हे दाखल करा. मी समर्थ आहे. ज्यांच्यावर गुन्हे झाले त्यांच्या पाठी राहायला मी समर्थ आहे. ही वृत्ती चुकीची आहे. आम्ही जन आशीर्वाद घ्यायला फिरतोय. लोकांच्या समस्या घेण्यासाठी फिरतोय. तुम्ही मिटिंगा घेतल्या, सभा घेतल्या तेव्हा कोरोना नाही झाला. आताच कोरोना होत आहे का? असा सवाल करतानाच तुम्ही गुन्हे दाखल करताना तुमच्या डोक्यावर कोण तरी दिल्लीत बसलं आहे हे लक्षात ठेवा. आम्ही वर आहोत तुम्ही खाली आहात, असा इशाराही त्यांनी दिला.

ते सुडबुद्धीने वागले तर आमचा फायदा होईल. महाराष्ट्रातील जनता सुडबुद्धीने वागणाऱ्यांकडे लक्ष देत नाही. मुंबईत भाजपची सत्ता येणं गरजेचं आहे. आम्ही जागतिक दर्जाचं शहर करू. विकास करू. कालच वाटलं भाजपचा भगवा फडकेल. काल वाटलं म्हणून सकाळी सकाळी पत्रकार परिषद घेतली. कारण सकाळी पत्रकार परिषद घेणं शुभ असतं, असं ते म्हणाले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments