R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति स्वत:ला मूल होत नसल्यानं मित्राच्या मुलाचा दिला बळी, पंचक्रोशीत पसरली संतापाची लाट

स्वत:ला मूल होत नसल्यानं मित्राच्या मुलाचा दिला बळी, पंचक्रोशीत पसरली संतापाची लाट

कोल्हापूर | छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीत अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी घटना गाडली असून या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. स्वत:ला मूल होत नाही म्हणून मित्राच्या मुलाचे अपहरण करून त्याचा बळी देण्यात आल्याची संतापजनक घटना सोनाळी येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे सर्वत्र हालहाल व्यक्त केली जात आहे.

समोर आलेय माहितीनुसार वरद रवींद्र पाटील असे बळी देण्यात आलेल्या सात वर्षाच्या बालकाचे नाव असून दोन दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. याबाबतची तक्रार त्याचे वडील रवींद्र गणपती पाटील यांनी मुरगूड पोलिसात दिली. परंतू पोलिसांना वरदचा शोध घेण्यात अपयश आले, त्याचा मृतदेह सोनाळी (ता.कागल) येथील डोंगरात मिळून आल्याने पंचक्रोशीतील नागरिक व महिलांतून प्रचंड संताप व्यक्त झाला. त्यांनी पोलिसांना घेराव घालून जाब विचारला.

वरद हा आपले आजोळ सावर्डे बुद्रुक येथे आजोबा दत्तात्रय शंकर म्हातुगडे यांच्या घरांच्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी आई-वडिलांसोबत गेला होता. मंगळवार रात्री साडे आठच्या सुमारास तो बेपत्ता झाला. रात्रभर व दुसऱ्या दिवशी सर्वत्र शोध घेवूनही त्याचा शोध लागला नाही. भरवस्तीत असणाऱ्या गल्लीतून वरद गायब कसा झाला याबाबत तर्क वितर्क वर्तवले जात होते. या गल्लीत नेहमी नागरिकांची वर्दळ असते, अशा ठिकाणाहून तो गायब झाल्याने त्याचवेळी हे कृत्य कुण्या माहितीतील व्यक्तीचे असण्याची शक्यता व्यक्त झाली होती. तोच अंदाज खरा ठरला.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘या’ समस्यांना मुळासकट उखडून फेकावं लागेल, उस्मानाबाद घटनेनंतर रुपाली चाकणकर कडाडल्या

  उस्मानाबाद जिल्ह्यात काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या एक गरीब कुटूंबातील मुलीचा तिच्या बाळंतपणामध्येच मृत्यू झाला आहे. ही घटना ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी...

नवाब मलिक यांच्याकडे समीर वानखेडेंच्या विरोधात पुरावे असतील

  मुंबई | अभिनेता शाहरुख खान याच्या मुलाला एनसीबी अटक केल्यानंतर सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली होती तसेच राज्याच्या राजकारणात सुद्धा एकाच खळबळ माजली होती. त्यातच...

‘नुसते मंत्रालय म्हणू नका, ते तर बंद आहे’ नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

  मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राणे कुटुंबीयांनी ठाकरे परिवार आणि शविसेना पक्षावर घणाघाती टीका केलेली दिसून आहे. त्यातच मालवण येथे केलेल्या विधानावरून...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments