R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या घरफाळ्याच्या तक्रारींसंदर्भात तात्काळ मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करा - राजेश क्षीरसागर

घरफाळ्याच्या तक्रारींसंदर्भात तात्काळ मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करा – राजेश क्षीरसागर

कोल्हापूर | कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्या कामकाजाबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. घरफाळा विभागात घोटाळा घडल्याच्या घटनाही वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातच घरफाळा विभागाकडून कायद्यातील तरतुदीचा चुकीचा अर्थ लावून नवीन बांधकाम झालेल्या इमारतींना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्याकरिता आणि घरफाळा लागू करण्याकरिता अवाजवी दंडाची रक्कम लावली जात असल्याने, घरफाळ्याची आणि बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्याची हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत, ही प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी आणि घरफाळ्याच्या अतिरिक्त दंडाच्या जनतेच्या तक्रारींच्या अनुषंगाने तात्काळ मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात यावे, यासह घरफाळा दंड रक्कमेबाबतीतील शासन निर्णयात आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांना दिल्या.

यावेळी बोलताना यावर्षी आलेल्या महापुराच्या पाण्यात बाधित झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई म्हणून राज्य शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. शहरातील पूरबाधितांचे पंचनामे करण्याची जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाची असून, पंचनाम्याची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून पूरबाधित नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळवून द्या. शहरातील कोरोना व नवीन डेल्टा प्लस रुग्णांची सद्यस्थिती बाबत विचारणा केली. यासह लाखो रुपयांचा घरफाळा बुडवूनही डॉ.कौस्तुभ वाईकर यांच्या सिद्धांत हॉस्पिटलवर कोणतीही कारवाई होत नाही. सन २०२१ च्या अधिसूचनेप्रमाणे डॉ.वाईकर यांच्या रुग्णालयावर दोन दिवसात कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले. घरफाळ्यासंर्दभात नागरिकांवर लादण्यात आलेल्या अतिरिक्त दंडाची रक्कमे बाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करावे. महानगरपालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याची आवश्यकता आहे परंतु सर्वसामान्य नागरिकांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. नगररचना विभागाबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असून, या विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करीत नगररचना विभागाने तात्काळ कामात सुधारणा करून लोकाभिमुक व्हावे, अशा सूचनाही केल्या.

यावेळी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी, पूरग्रस्त नागरिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून, पंचनाम्याची पडताळणी सुरु आहे. सदर पडताळणी पूर्ण केल्यानंतर लवकरच शासनाकडे निधी साठी प्रस्ताव सादर करण्यात येईल. शहरात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असून रोज सुमारे २५०० टेस्ट केल्या जातात त्यातही पॉझीटिव्ह रेट दीड ते दोन टक्के इतका आहे. यासह डेल्टा प्लस रुग्णांची संख्याही आवाक्यात आहे. घरफाळ्याच्या तक्रारींसदर्भात नागरिकांसाठी आठवड्यातील दोन दिवस ठरवून मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करू. या शिबिराद्वारे नागरिकांच्या सर्व समस्यांचे निराकरण केले जाईल. यासह दिलेल्या सुचनेनुसार नगररचना विभागाच्या कामकाजात सुधारणा होवून नागरिकांना नाहक त्रास होणार नाही, याची दक्षता घेवू, असे सांगितले.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

Recent Comments