R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या नारायण राणेंनी काढलेल्या जनअर्शिवाद यात्रेवर मुंबई पोलिसांची कारवाई,

नारायण राणेंनी काढलेल्या जनअर्शिवाद यात्रेवर मुंबई पोलिसांची कारवाई,

 

मुंबई | भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काढलेल्या जन अर्शिवाद यात्रेला कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या गर्दीवर आता पोलिसांनी कारवाई केली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करण्यास मनाई असताना देखील भाजपच्या जनअर्शिवाद यात्रेला मोठी गर्दी झाली, त्यामुळे आता मुंबई पोलिसांनी यावर विविध ठिकाणी 19 गुन्ह्यांची नोंद केली आहे. यामध्ये माहिम आणि आग्रीपाडा पोलीस स्थानकात तीन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

या शिवाय शिवाजी पार्क, दादर, आझाद मैदान, खैरवाडी, चेंबूर, विले पार्ले, सायन, गोवंडी आणि विमानतळ भाग येथील पोलीस ठाण्यात कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ आणि मुंबई पोलीस कायदा कलम १३५ नुसार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यात सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे, संसर्गजन्य आजार पसरविण्याची कृती करणे व आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वात जनआर्शिवाद यात्रा काढली. त्यावर हे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या यात्रेची सुरुवात राणेंनी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला अभिवादन करुन केली. पण राणेंनी शिवाजी पार्क येथील शिवसेना प्रमुखांच्या स्मृती स्थळाला अभिवादन केल्यानंतर शिवसैनिक आप्पा पाटील यांनी ही जागा गोमुत्र आणि दुधाचा अभिषेक करुन शुद्ध करण्यासाठी केली त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments