R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'ठाकरे'च्या दिग्दर्शकाचा सरकारवर निशाणा, कलाकारांना खड्डे बुजवण्याचे काम द्या

‘ठाकरे’च्या दिग्दर्शकाचा सरकारवर निशाणा, कलाकारांना खड्डे बुजवण्याचे काम द्या

 

मुंबई | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मागच्या मार्च महिन्यापासून राज सरकारने अनेक गोष्टींवर निर्बंध लादले होते, त्यातच कोरोना संसर्ग कमी होत असताना आता ठकरे सरकारने १५ ऑगस्टपासून राज्यात कोरोनावरील बहुतांश निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे, राज्यात रात्री १० वाजेपर्यंत दुकाने खुली करण्यात मुभा देण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र दुसरीकडे राज्यातील सिनेमागृहे, नाट्यगृहे आणि प्रार्थनास्थळे पूर्णपणे बंदच ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे, या क्षेत्राशी संबंधितांना अद्यापही उपासमारीची सामना करावा लागत असून या निर्णयासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. ठाकरे चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

याच पार्श्वभूमीवर आता अभिजीत पानसे यांनी ट्विट करुन सरकारवर निशाणा साधला आहे ‘सरकारने नाट्य कलावंत आणि बॅकस्टेज कलाकारांना निदान रोजगार हमी योजनेत सामील करून खड्डे बुजवण्याची कामं द्यावीत. कारण नाट्यगृहात कोरोना आहे, रस्त्यावर नाही !, असा टोला पानसे यांनी राज्य सरकारला लगावला आहे. त्यामुळे, राज्य सरकार याकडे लक्ष देणार का, असा प्रश्न आहे.

कोरोना महामारीमुळे जवळपास गेल्या १.५ वर्षांपासून राज्यातील प्रार्थनास्थळे आणि सिनेमागृहे बंद आहेत. त्यामुळे, मंदिरे खुली करण्यासाठी भाजपा नेते आणि अध्यात्मिक आघाडी, वारकरी संघटना आग्रही आहे. तर, दुसरीकडे सिनेमागृहे बंद असल्याने कलाकार, तमाशा कलावंत आणि नाटक क्षेत्रातील कलाकारांचीही मोठी अडचण होत आहे.

 

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

Recent Comments