R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या संभाजीनगरात मनसे-भाजपा युती होणार ?

संभाजीनगरात मनसे-भाजपा युती होणार ?

 

संभाजीनगर | राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी पालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष आता नव्याने प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये भाजप आणि मनसे यांच्यात बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी भाजपचे बडे नेते आणि मनसेमधील मोठे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

सदर बैठक शासकीय विश्रामगृहावर पार पडणार असून यामध्ये स्वतः विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे हजर राहण्याची चर्चा आहे. त्यामुळे संभाजीनगरमध्ये भाजप आणि मनसे युती होणार का ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. संभाजीनगर महापालिकेत मनसे आणि भाजप युतीच्या चर्चांना वेग आला हे. या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चाही सुरू आहे.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. त्यामुळे एकाकी पडलेल्या भाजप आता मनसेचा हात धरण्याची शक्यता आहे. औरंगाबादमध्ये निवडणुकांच्या तयारीला आतापासूनच सुरुवात झाली आहे. सत्ताधारी शिवसेना स्वबळावर रिंगणात उतरू शकते. त्यामुळे त्यांच्यासमोर भाजप पक्षाला आव्हान असणार आहे. मात्र, मनसेनेही ताकदीने या निवडणुकीत उतरणार आहे. त्यामुळे येत्या काळात निवडणूकांमध्ये काय रंग पाहायला मिळतो? याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments