R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "नरेंद्रजी तुम्ही गोंधळाला या हो"; राष्ट्रवादीच्या आंदोलनातून चाकणकरांनी लगावला मोदीला टोला |

“नरेंद्रजी तुम्ही गोंधळाला या हो”; राष्ट्रवादीच्या आंदोलनातून चाकणकरांनी लगावला मोदीला टोला |

 

केंद्रातील मोदी सरकारकडून वारंवार गॅस, पेट्रोलच्या दरात वाढ केली जात आहे. या वाढत्या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांना याची झळ सोसावी लागत आहे. एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे वाढती महागाई यामुळे सामान्य नागरिक हतबल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आज मोदी सरकारच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीच्या वतीने पुण्यातल्या स्वारगेट चौकात जागरण गोंधळ घालून आंदोलन करण्यात आले.

‘प्रधानसेवक नरेंद्रजी तुम्ही गोंधळाला या हो, निर्मला आक्का तुम्ही या जागराला या हो..’असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. केंद्र सरकारच्या इंधन दरवाढी विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गोंधळ, जागर करत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.

रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या या आंदोलनातून मोदी सरकारवर निशाणा साधला. यावेळी टीका करताना चाकणकर म्हणाल्या की, केंद्र सरकारला सद्बुद्धी येण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. महागाईच्या विरोधात महिलांचा रोष आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त झाला आहे. केंद्र सरकारमुळे महिलांचे अर्थिक नियोजन कोलमडून गेले आहे. त्यामुळे आता तरी या मोदी सरकारला सुबुद्धी यावी.

 

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments