R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, October 18, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करणारे बैल आहेत' पुन्हा दानवेंची जीभ घसरली

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करणारे बैल आहेत’ पुन्हा दानवेंची जीभ घसरली

 

राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ‘सांड’ म्हणत नवा वाद आपल्या अंगावर ओढावून घेतला आहे. या वादावर पडदा टाकताना पुन्हा एकदा दानवे यांची जीभ घसरली आणि त्यांनी थेट ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करणारे बैल आहेत’, असे विधान करून टाकले. राहुल यांच्यावरील टीकेनंतर काँग्रेस-भाजपमध्ये जुंपलेली असताना आता भाजपमध्येच दानवेंच्या वक्तव्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.

मोदी सरकारमध्ये नव्याने समावेश करण्यात आलेले राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडय़ात जनआशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. शुक्रवारी ही यात्रा जालना जिल्हय़ात आली. यावेळी बदनापूर येथे आयोजित सभेत पेंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी यांच्यावर अतिशय हीन दर्जाची टीका केली.

राहुल गांधी हे सांड असून कोणत्याच कामाचे नसलेले जनावर असे तारे दानवे यांनी तोडले होते. दानवे यांच्या विधानावरून प्रचंड वादंग निर्माण झाले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी दानवे यांच्याविरोधात उग्र आंदोलने केली. रावसाहेब दानवे यांना थेट प्रश्न विचारला असता त्यांनी पुन्हा एकदा आपण राहुल गांधी यांना सांड म्हणाल्याचे कबूल केले.

दानवे म्हणाले की, उपस्थितांनी आपल्याला प्रश्न विचारला आणि आपण त्याचे उत्तर दिले अशी मखलाशी त्यांनी केली. एवढेच नाही तर आपल्या वक्तव्याचे समर्थन करताना त्यांनी बैलाचे उदाहरण दिले. शेतात काम करणारे बैल दोन प्रकारचे असतात. एक काम न करणारा आणि एक काम करणारा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करणारे बैल आहेत आणि राहुल गांधी हे काम न करणारा सांड बैल. कोणत्याही कामाचे नसलेले जनावर असे विधान त्यांनी केले होते.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

Recent Comments