R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "राज्यानं केंद्राकडे बोट करण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवला, भरती पवार यांची घणाघाती...

“राज्यानं केंद्राकडे बोट करण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवला, भरती पवार यांची घणाघाती टीका

राज्यात येणाऱ्या स्थानिक निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राज्यात केंद्र सरकारमधील नवनियुक्त मंत्र्यांसोबत भाजपची जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या धर्तीवर या यात्रेचं भाजपकडून आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री राज्यमंत्री भारती पवार यांची यात्रा सध्या उत्तर महाराष्ट्रात आली आहे. आपल्या मंत्रीपदाचा जास्तीत जास्त उत्तर महाराष्ट्राला कसा फायदा होईल या हेतूनेच आपण काम करत आहोत, असं भारती पवार म्हणाल्या.

कोरोना काळात केंद्र सरकारने राज्याला भरपूर मदत केली आहे. लसीकरणासाठी मोफत डोस उपलब्ध करण्यात आले आहेत. या कोरोना काळात महाराष्ट्राला सर्वाधीक लसी उपलब्ध केल्या आहेत. पण महाविकास आघाडी सरकारने राज्यास मदत करण्याचं सोडून केंद्र सरकारकडे बोट करण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवला, अशी टीका त्यांनी केली.

नंदुरबार जिल्हाच्या आरोग्य सुविधांसाठी आपण काम करण्यासाठी कटीबद्ध आहोत. केंद्रीय मंत्रीपदाच्या निधीमार्फत जिल्हातील पायाभूत सुविधांसाठी काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पवार या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान नंदुरबारमध्ये बोलत होत्या. या यात्रेस माजी मंत्री जयकुमार रावल, गिरीष महाजन यांच्यासह अन्य आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. आता भरती पवार यांच्या टीकेला महाविकास आघाडी काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments