R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या एकनाथ शिंदे संदर्भात नारायण राणे यांची खळबळजनक माहिती म्हणाले की,

एकनाथ शिंदे संदर्भात नारायण राणे यांची खळबळजनक माहिती म्हणाले की,

 

मुंबई | भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ‘एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असले तरी ते सहीपुरते आहेत. मातोश्रीच्या परवानगीशिवाय एकही फाईल हालत नाही,’ असे नारायण राणे म्हणाले. यावर तुमच्याकडे येणार आहेत का? असे पत्रकारांनी विचारले असता, ‘आले तर घेऊन टाकू’ असे उत्तर दिले.

एकनाथ शिंदे या प्रकाराला कंटाळले असून लवकरच निर्णय होईल, असा गौप्यस्फोट यावेळी नारायण राणे यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर शिवसैनिकांनी त्या स्मारकाचे शुद्धीकरण करून घेतले होते. त्याबद्दल त्यांनी पुन्हा शिवसैनिकांवर टीका केली. मी माझ्या वडिलांचे स्मारक स्वत:च्या पैशांनी व दलदलीच्या जागेत न बांधता चांगल्या जागेत बांधले आहे अशा शब्दांत खोचक टीका केली.

जन आशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे यात्रेच्या मध्येच वसईचे आमदार आणि बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला गेल्याने भाजप कार्यकर्ते संतप्त झाले. राणे यांनी जाऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी विरोध केला; परंतु त्याला न जुमानता राणे ठाकूर यांना भेटायला गेले. ठाकूर यांनी राणे यांचे स्वागत करत त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments