R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या उद्धव ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यावर हातोडा, राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चेला...

उद्धव ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यावर हातोडा, राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चेला उधाण

 

केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण खात्याने सीआरझेड अर्थात किनारा नियमन क्षेत्र अधिसुचना २०१८ कायदा जारी केला आहे. त्याच कायद्याचा आधार घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिंलिद नार्वेंकर यांचा मुरूड येथील बंगला तोडण्याचं काम चालू आहे. मिलिंद नार्वेंकर यांच्यावर सीआरझेड नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणाबाबत भाजप नेते किरीट सोमय्यांनी तक्रार दाखल केली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे PA आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेंकराचा हा बंगला दापोलीमधील मुरूडच्या समुद्र किनाऱ्यावर आहे. हा बंगला ज्या ठिकाणी बांधला आहे. ती जागा सीआरझेडच्या नियमाचे अधिक्षेत्रात येते. अशी तक्रार किरीट सोमय्यांनी केंद्रीय पर्यावरण विभागाकडे केली होती. या तक्रारीमध्ये अजून काही बंगल्यांचा समावेश आहे. मात्र थेट कार्यवाईची सुरूवात नार्वेंकरांच्या बंगल्यापासुन केली आहे.

मुरूड येथील बंगला पाडायला सुरूवात केल्यानंतर, करून दाखविले, मिलिंद नार्वेंकराचा बंगलो तोडला. मुरूड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नर्वेकर यांचा बेकायदा बंगलो पाडण्याचे काम आता सुरू झाले. पुढचा नंबर मंत्री अनिल परब रिसॉर्टचा. उद्या मी दापोलीला जावून तोडकामाची पाहणी करणार, असं किरीट सोमय्यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान, मिलिंद नार्वेकरांनी हा बंगला बांधण्यासाठी समुद्र किनाऱ्याजवळील सुमारे साडेचारशे झाडं कापली होती. तसेच त्या जागेची बाजारभावानुसार किंमत आज १० कोटी इतकी आहे. त्यांना कदाचित पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचं मार्गदर्शन असावं, असंही सोमय्यांनी म्हटलं आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments