R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति राणे यांच्या टीकेला आता एकनाथ शिंदे यांचे सडेतोड उत्तर

राणे यांच्या टीकेला आता एकनाथ शिंदे यांचे सडेतोड उत्तर

 

जनआशीर्वाद यात्रेत बोलताना भाजपनेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी , ‘नगरविकास खाते हे एकनाथ शिंदे नव्हे. तर ते मातोश्रीवरून चालविले जात आहे. तसेच शिंदे हे फक्त सही पुरते नगरविकासमंत्री असून ते मार्ग शोधत आहेत असे म्हटले होते. आता राणे यांनी केलेल्या भाष्यावर नगरविकास मंत्री एकनाथ सिंदे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

शिंदे म्हणाले की, केंद्रीय मंत्र्यांच्या विधानाबाबत मी देखील काल माहिती घेतली. त्यांनी हा शोध कुठून लावला काय माहित! परंतु बोलयला कोणीही काही बोलू शकतो. मी माझ्या विभागामध्ये सक्षमपणे काम करतोय. या कामावर मी समाधानी आहे. मला नगरविकास खात्याचे सर्व निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असल्यामुळे मी राज्यातील महत्वकांशी प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देत आहेत.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, माझ्या विभागामध्ये मातोश्री आणि मुख्यमंत्र्यांचे हस्तक्षेप असल्याचे विधान चुकीचे आहे. त्यात कुठलेही तथ्य नाही. खरे तर राणे साहेब मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळे राज्याच्या हिताचे मोठे निर्णय किंवा धोरणात्मक निर्णय सर्वच विभागातील मंत्री मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखालीच घेत असतात.आणि त्यात कुठलेही गैर नाही. ते केंद्रात मंत्री आहेत. त्यामुळे पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखालीच निर्णय घेत असतील असे त्यांनी बोलून दाखविले होते.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

शिवसेना खासदार भावना गवळींना पुन्हा ईडीचे समन्स

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्र्यांना, खासदार आणि आमदारांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा मागे लागला आहे. त्यातच शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या...

इंधन दरवाढीवर आंदोलन करणारा भाजप आता गप्प का ?

  मुंबई | राज्यात एकीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे आज बेरोजगारीमुळे उपासमारीची वेळ आलेली असताना त्यात दुसरीकडे वाढत्या इंधनदरवाढीमुळे सामान्य व्यक्ती हतबल झाला आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments