R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या नारायण राणे आपला १२ मजली बंगला तोडण्याचे धाडस दाखवतील का?

नारायण राणे आपला १२ मजली बंगला तोडण्याचे धाडस दाखवतील का?

 

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दापोलीतील बंगला बांधताना सीआरझेड कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्या बंगल्यावर कारवाई कारण्यात आली याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी जोरदार टीका सेनेवर केली होती . आता सेनेच्या या टीकेला आमदार वैभव नाईक यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. बांधकाम अनधिकृत असेल तर ते स्वत: तोडण्याचं धाडस आज मिलिंद नार्वेकर यांनी दाखवलं आहे.

नाईक म्हणाले की, भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुंबईतील जुहू येथील १२ मजली बंगलाही सीआरझेड कायद्याचं उल्लंघन करून बांधला आहे. मग असं धाडस आता राणे दाखवणार आहेत का? असा थेट सवाल शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थितीत केला होता. नाईक यांच्या या विधानाने नव्या वादाला तोंड फुटले आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आपला दापोलीतील आलिशान बंगला जमीनदोस्त केला आहे. या प्रकरणावरून भाजपने नार्वेकरांवर टीकेची झोड उठवली आहे.

शिवसेनेचे मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी राणेंवर निशाणा साधला आहे. मिलिंद नार्वेकरांना बंगला बांधताना सीआरझेड कायद्याचं उल्लंघन झाल्याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ बांधलेला बंगला पाडण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे बांधलेला बंगला पाडण्याचं धाडस मिलिंद नार्वेकर यांनी दाखवून राजकारणात एक चांगला पायंडा पाडला आहे असं वैभव नाईक म्हणाले. तसंच, सदर बंगल्याला स्थानिक तहसील किंवा तलाठी यांच्याकडून कोणतीही नोटीस बजावण्यात आलेली नाही. अशी माहिती सुद्धा नाईक यांनी दिली

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

Recent Comments