R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या संरक्षणमंत्री राजनाथ सिंह मंगळवारी पुणे दौऱ्यावर

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह मंगळवारी पुणे दौऱ्यावर

पुणे | संरक्षण मंत्री राजनाथसिंह हे सोमवारी पुणे दौऱ्यावर येणार होते. मात्र काही कारणास्तव त्यांचा दौरा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. ते मंगळवारी पुणे येथे भेट देतील. या दौऱ्यामध्ये ते येथील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज (डीआयएटी) आणि आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट या दोन्ही संस्थांना ते भेट देणार आहेत.

‘डीआयएटी’ येथील सर्वसाधारण सभेत सिंह सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर याठिकाणी नवीन इमारतीचे उद्‌घाटन सिंह यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे हेदेखील उपस्थित असतील. घोरपडी येथील आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट येथील स्टेडियमचे नाव बदलून नीरज चोप्रा आर्मी स्पोर्टस स्टेडियम असे नामकरण करण्यात येणार आहे.

या सोहळ्यास राजनाथ सिंह यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे सर्व सशस्त्र दलाचे जवान यांचा सिंह यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. भालाफेक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांच्यासह अन्य स्पर्धक यावेळी उपस्थित राहण्याची शक्‍यता आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments