R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या तुम्ही मंत्री असला तरी निर्णय मोदींनाच विचारुन घ्यावे लागतील; शिंदेंनी लागवला राणेंना...

तुम्ही मंत्री असला तरी निर्णय मोदींनाच विचारुन घ्यावे लागतील; शिंदेंनी लागवला राणेंना टोला

 

मुंबई | नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेला कंटाळले असून ते केवळ सहीपुरते मंत्री राहिले आहेत, असं मोठं वक्तव्य केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उपक्रम मंत्री नारायण राणे यांनी विरार येथे एका कार्यक्रमादरम्यान केलं होतं. आता एकनाथ शिंदे यांनी यावर प्रत्युत्तर दिलं असून राणेंवर जोरदार पलटवार केला आहे. नारायण राणे जरी मंत्री असले तरी त्यांना धोरणात्मक निर्णय हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच विचारुन घ्यावे लागतील, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

नारायण राणे यांनी एकनाथ शिंदे जरी नगरविकास मंत्री असले तरी ते केवळ सहीपुरते आहेत. एकनाथ शिंदे मातोश्रीशिवाय एकही फाईल सही करु शकत नाहीत, असा दावा केला होता. हा दावा एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावला. परंतु धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल त्यावेळी नगरविकासच नाही तर कोणत्याही खात्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्याच संमतीने मंत्रिमंडळाला घ्यावा लागतो.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, नारायण राणे युतीच्या काळात मुख्यमंत्री राहिले आहेत त्यामुळे याची त्यांना जाणीव असेल. मात्र नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत पण धोरणात्मक निर्णय घेताना पंतप्रधानांची संमती घेऊनच तो घ्यावा लागेल, असं म्हणत राणे यांनी केलेलं वक्तव्य हे संभ्रम निर्माण करणारं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

 

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

Recent Comments