R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या राणे यांच्या 'जन आशीर्वाद यात्रे' विरोधात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत ४२ गुन्हे केले...

राणे यांच्या ‘जन आशीर्वाद यात्रे’ विरोधात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत ४२ गुन्हे केले दाखल

 

मुंबई | पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये मंत्रिमंडळ विस्तारानंतर सहभागी झालेल्या नवीन मंत्र्यांनी देशभरात ठिकाणी जन आशीर्वाद यात्रा सुरू केली असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गर्दी जमवल्याप्रकरणी कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन असून प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यामुळे याविरोधात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेबाबत मुंबई पोलिसांनी आतापर्यंत ४२ एफआयआर नोंदवले आहेत. विविध कलमांसह साथीच्या कायद्याखाली नोंदवलेल्या या गुन्ह्यामध्ये मंत्री आणि कार्यकर्त्यांवर मुंबईच्या विविध भागात जन आशीर्वाद यात्रेदरम्यान कोविड -19 नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. ठाकरे सरकारकडून यापूर्वी मुंबईतील भाजपच्या मेळाव्यात कोविड नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल १७ एफआयआर दाखल केले होते. २० ऑगस्टपर्यंत मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये भाजप नेते आणि कार्यकर्त्यांविरोधात १९ एफआयआर नोंदवण्यात आले होते.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी लादलेल्या निर्बंधांकडे दुर्लक्ष करत राणे यांनी १९ ऑगस्ट रोजी जन आशीर्वाद यात्रा सुरू केली होती. राज्यात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव असताना अनेक विरोधी नेत्यांनी रॅली काढल्याचा निषेध केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० ऑगस्ट रोजी केंद्रातील नवनियुक्त मंत्री जन आशीर्वाद यात्रा काढणार असल्याची घोषणा केली होती.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments