R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति मुख्यमंत्र्यांची दही हंडी उत्सवा बाबत गोविंदा पथकांच्या प्रतिनिधी सह बैठक

मुख्यमंत्र्यांची दही हंडी उत्सवा बाबत गोविंदा पथकांच्या प्रतिनिधी सह बैठक

 

मुंबईत जरी निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरीही सणांवर अजूनही बंदीच आहे. दहीहंडी, गणेशोत्सवासाठी या सणांसाठी अवघे काही दिवस उरले असताना सणांसाठी निर्बंधांत सूट देण्याची मागणी करण्यात येत आहे. येत्या ३१ ऑगस्टला दहीहंडी उत्सव आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतील प्रमुख गोविंदा पथकांसोबत एक बैठक आयोजित केली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे अनेक सण, उत्सवांवर बंदी घालण्याची वेळ सरकारवर आली आहे. दसरा, दिवाळीसारखे मोठे सणही अत्यंत साधेपणाने साजरे केले जात आहेत. अशावेळी मनसेनं मात्र दहीहंडी उत्सवासाठी शड्डू ठोकला आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळत आणि योग्य खबरदारी घेऊन ३१ ऑगस्टला विश्वविक्रमी दहीहंडी साजरी करणार असल्याचं मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसे नेते अभिजित पानसे यांनी म्हटलं आहे.

३१ ऑगस्टला दहीहंडी साजरी करणार आहोत. त्यासाठी अनेक मंडळांना आवाहन केलं आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन दहीहंडी उत्सवात सामील व्हा आणि आपला मराठी सण एकत्र येऊन आनंदाने साजरा करा, असं अभिजित पानसे यांनी म्हटलंय. मनसेच्या या आवाहनामुळे आता जोरदार चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे राज्य सरकार, स्थानिक प्रशासन आणि पोलीस या बाबत काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

शिवसेना खासदार भावना गवळींना पुन्हा ईडीचे समन्स

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्र्यांना, खासदार आणि आमदारांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा मागे लागला आहे. त्यातच शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या...

इंधन दरवाढीवर आंदोलन करणारा भाजप आता गप्प का ?

  मुंबई | राज्यात एकीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे आज बेरोजगारीमुळे उपासमारीची वेळ आलेली असताना त्यात दुसरीकडे वाढत्या इंधनदरवाढीमुळे सामान्य व्यक्ती हतबल झाला आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments