R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांचे पणतू डॉ. रोहित माडेवार यांचा भाजपमध्ये प्रवेश

माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांचे पणतू डॉ. रोहित माडेवार यांचा भाजपमध्ये प्रवेश

 

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांचे पणतू व रोटी फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ.रोहित माडेवार यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकून डॉ. रोहित माडेवार यांना पक्षात प्रवेश दिला.

याप्रसंगी भाजपा प्रदेश महामंत्री तथा राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम, शहर संघटनमंत्री सुनील मित्रा, दक्षिण पश्चिम नागपूरचे अध्यक्ष किशोर वानखेडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

रोटी फाऊंडेशन चे अध्यक्ष म्हणून व विमुक्त भटक्या जाती चे प्रतिनिधी म्हणून डॅाक्टर माडेवार ह्यांनी संपूर्ण विदर्भात कार्य केलेले आहे, हे पाहू जाता त्यांनी भविष्यात त्याच दृष्टीने कार्य करावे अशी अपेक्षा देवेंद्रजी फडणवीस यांनी व्यक्त केली.

विमुक्त भटक्या जाती आपल्या प्रश्नांसंदर्भात अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. या अनेक वर्षांच्या संघर्षाला न्याय मिळवून देऊन लढा यशस्वी करण्याची क्षमता विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यामध्ये आहे. हा लढा यशस्वी करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वात खांद्याला खांदा लावून काम करणार, असा विश्वास यावेळी डॉ. रोहित माडेवार यांनी व्यक्त केला.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments