R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'अजितदादा काय म्हणतात त्याला काडीची किंमत नाही' - गोपीचंद पडळकर

‘अजितदादा काय म्हणतात त्याला काडीची किंमत नाही’ – गोपीचंद पडळकर

 

सांगली | पोलिसांना गुंगारा देत भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी झरे गावात बैलगाडा शर्यत घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर कडक कारवाईचे संकेत दिले होते. आता अजित पवारांच्या या निर्णयानंतर पडळकर यांनीही अजित पवारांना उत्तर देत जोरदार टीका केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि पडळकर यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पडळकरम्हणाले की, बैलगाडा शर्यत सुरु करण्याविषयी अजितदाद काय बोलतात त्याला काडीची किंमत नाही. अजित पवार यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी स्टेटमेंट दिली आहेत. महाविकास आघाडी सरकार मोगलांच्या वृत्तीचं सरकार असल्याचा आरोपही पडळकर यांनी केला कराडमधील बैलगाडा मालक धनाजी शिंदे यांच्या घरी गोपीचंद पडळकर यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही टीका केली होती.

अजितदादा काय म्हणतात त्याला काडीची किंमत नाही. त्यांनी अनेकदा वेगवेगळी स्टेटमेंट दिली आहे. हा राजकारणाचा मुद्दा नाही. त्यांची भाषणं काढून पाहा. बैलगाडा शर्यत चालू नाही झाली तर अजित पवार नाव सांगणार नाही, अशी त्यांची भाषणं आहेत, असा टोला पडळकरांनी लगावला आहे. झरे गावातील आंदोलन सरकारला मोडून काढायलं होतं. दोन वर्षात कोर्टाकडे का गेला नाहीत. मराठा आरक्षणाचा वकील त्यांनीच नेमला होता. सरकार आमच्याकडे कागदपत्र देत नाही. म्हणून आम्ही मराठा आरक्षणाबाबत योग्य मत मांडू शकलो नाहीत. आजचं सरकार मोगलांच्या वृत्तीचं असल्याचा आरोपही पडळकर यांनी केला आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

क्रांती रेडकरने मौलानांचे दावे फेटाळले, ही माहिती आधी द्यायला हवी होती

  मुंबई | समीर वानखेडे यांचा पहिला निकाह लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी समीर मुस्लिम असल्याचा दावा केला. या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यावर...

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

क्रांती रेडकरने मौलानांचे दावे फेटाळले, ही माहिती आधी द्यायला हवी होती

  मुंबई | समीर वानखेडे यांचा पहिला निकाह लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी समीर मुस्लिम असल्याचा दावा केला. या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यावर...

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

Recent Comments