R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, October 18, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति मुख्यमंत्री ठाकरे विरोधात वादग्रस्त वक्तव्य भोवणार राणे विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

मुख्यमंत्री ठाकरे विरोधात वादग्रस्त वक्तव्य भोवणार राणे विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

 

जन आशिर्वाद यात्रेदरम्यान रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत वादग्रस्त विधान करणं चांगलंच भारी पडणार आहे. मुख्यमंत्र्यांचा स्वातंत्र्यदिनी व्हायरल झालेल्या व्हीडिओचा आधार घेत नारायण राणेंनी.. ‘मी बाजूला असतो तर कानाखाली चढवली असती.’ असं वक्तव्य केलं. ज्यामुळे आता नारायण राणेंविरोधात महाड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबंधी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाडचे युवासेनेचे पदाधिकारी सिद्धेश पाटेकर यांच्या फिर्यादनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विविध कलमा अंतर्गत नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल्याचं समजतं आहे. महाड शहरचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस हे या प्रकरणी तपास करणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसात नाराय राणे आणि शिवसेना हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘या मुख्यमंत्र्यांना देशाचा हिरक महोत्सव आहे की अमृत महोत्सव हेच माहिती नाही. 15 ऑगस्टला राज्यातील जनतेला उद्देशून भाषण करत असताना उद्धव ठाकरे मागे उभे असलेल्या मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना विचारतात हिरक महोत्सव आहे ना? मी त्या जागी असतो तर कानाखाली चढवली असती असे विधान नारायण राणे यांनी केले होते.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

महाविकास आघाडी सरकारच्या पापाचा घडा भरला आहे

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षाकडून सतत सरकार पडण्याच्या वेगवेगळ्या तारखा जाहीर करण्यात येत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा भाजपा नेते आणि...

देश हुकुमशाहीच्या उंबरठयावर, प्रकाश आंबेडकर यांचा उद्धव ठाकरे यांच्या विधानाला पाठिंबा

  अकोला | केंद्राकडून राज्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण होत असल्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बोलून दाखविले होते आता त्यांच्या या भूमिकेचे वंचित बहुजन आघाडीचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

Recent Comments