R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति "नारायण राणेंचा माज उतरवू, घरात घुसुन 'त्यांचा' हिशेब चुकता करू"

“नारायण राणेंचा माज उतरवू, घरात घुसुन ‘त्यांचा’ हिशेब चुकता करू”

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या विधानावरून शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले असून शिवसेनेने बँनरबाजी करून नारायण राणेंवर निशाणा साधला आहे.त्यातच आता शिवसैनिक आक्रमक झाले असून पुणे, नाशिक, महाड आणि संभाजीनगरमध्ये शिवसेनेकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच लवकरच राणे यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात येणार आहे.

त्यातच आता शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. नारायण राणेंचा माज उतरवू, त्यांच्या घरात घुसून शिवसैनिक काय असतो हे दाखवून देऊ. विरोधी पक्षाने केवळ भुंकण्यासाठी सोडलं आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांना कानशिलात लगावण्याची भाषा करता, यापुढे अशी भाषा केली तर घरात घुसून तुम्हा हिसका दाखवू, असे शिवसेना आमदार संजय गायकवाड म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना नारायण राणे यांनी हे विधान केलं. ‘त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून. अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती,’ असे नारायण राणे म्हणाले त्यांच्या या विधानानंतर याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटताना दिसून येत असून शिवसैनिकांनी नाशिक मध्ये भाजपच्या कार्यालयावर दगडफेक केली होती.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

कसलीही चौकशी लावा, मी घाबरत नाही-शशिकांत शिंदे

  सध्या राज्यात अनेक नेत्यांवर ईडीची कारवाई करण्यात येत आहे. तसेच अनेक मंत्र्यांवर सुद्धा सुरक्षा यंत्रणेच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागला आहे. याचं पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात...

राज ठाकरे यांचं हिंदुत्व बेगडी आहे, हे दाखवून दिलंय” शिवसेना खासदार विनायक राऊत यांची घणाघाती टीका

  दोनच दिवसांपूर्वी साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. या भेटीनंतर माँ कांचनगिरी यांनी...

मेळावे घेण्यापलीकडे रुपालीताईंनी महिलांसाठी केलंय तरी काय..? – शालिनीताई ठाकरे यांचा टोला !

  राज्य महिला आयोगाला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या अध्यक्षपदाचा चाकणकरांनी गुरुवारी पदभार स्वीकारला होता. त्यावर मनसे नेत्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची ‘पाकिस्तानी मैत्री’ भोवणार, पंजाब सरकारकडून चौकशीचे आदेश

  पंजाब | पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आता काॅंग्रेस विरोधात मोर्चा उघडला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन...

Recent Comments