R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या पोलिसांनी नितेश राणे यांना रत्नागिरीमध्ये जाण्यापासून रोखले, ट्विट करून दिली माहिती

पोलिसांनी नितेश राणे यांना रत्नागिरीमध्ये जाण्यापासून रोखले, ट्विट करून दिली माहिती

 

शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांचे एक पथक त्यांना अटक करण्यासाठी चिपळूणला रवाना झाले आहे. या पथका मध्ये दोन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. याप्रकरणी शिवसेनेचे पुणे युवा सरचिटणीस रोहित रमेश कदम यांनी तक्रार दिली होती.

 

सोमवारी पत्रकार परिषदेत बोलत असताना राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती. याप्रकरणी शिवसेना युवासेनेचे सरचिटणीस रोहित कदम यांनी त्यासंदर्भात चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यातच आता पोलिसांनी नारायण राणे यांचे पुत्र आणि आमदार नितेश राणे यांना रत्नागिरीत जाण्यापासून रोखले आहे. या संदर्भातील माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.

या संदर्भात नितेश राणे यांनी ट्विटरवर व्हिडीओ ट्वीट करत दिली आहे. त्यांनी यावेळी पोलिसांकडे कोणताही लेखी आदेश नसल्याची तक्रार केली असून राज्य सरकारवर निशाणा साधला. पोलिसांकडून मला मारण्याची भाषा केली जात असल्याचा आरोपही यावेळी नितेश राणे यांनी केला आहे. रत्नागिरीच्या दिशेने मी माझ्या पद्धतीने जात होतो. मला आणि अन्य सामान्य नागरिकांना आपल्या कामासाठी रत्नागिरीला जायला पोलीस देत नाही. यांच्याकडे कुठल्याही लेखी पद्धतीचा आदेश नाही. पोलीस खात्यामार्फत सामान्य नागरिकांना थांबवण्याचे काम केले जात आहे. हे संबधित पोलीस मला मारण्याची भाषा करत आहेत, याची दखल आपण घ्यावी असे त्यांनी व्हिडिओत म्हंटले आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

Recent Comments