R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया शिवसेनेच्या 'त्या' पोस्टरवर नितेश राणेंचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोला घर कोंबडा केला उल्लेख

शिवसेनेच्या ‘त्या’ पोस्टरवर नितेश राणेंचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोला घर कोंबडा केला उल्लेख

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्यात एकच गोंधळ उडाला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात मुंबईतील दादर टीटी परिसरात बॅनरबाजी पाहायला मिळाली. शिवेसेनेने नारायण राणे यांचा कोंबडी चोर असा उल्लेख करत डिवचणारा बॅनर लावला होता. परंतु पोलिसांनी सध्या हे बॅनर काढून टाकले आहे.

दरम्यान, यानंतर भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून फोटो शेअर करत शिवसेनेला डिवचले आहे. ट्विटमध्ये नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ‘घर कोंबडा’ असा उल्लेख करणारा फोटो आपल्या ट्विटर शेअर केला आहे. तसेच यामध्ये त्यांनी हा बॅनर कोण काढणार असाही सवाल केला आहे. तसेच हा बॅनर संकेत बावकर या राणे समर्थकाने शेअर केला आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर केंद्रीय मंत्री नारायण राणे हेदेखील आक्रमक झाल्याचे दिसून आले. नारायण राणेंनी आक्रमक पवित्रा घेत शिवसेनेवर हल्ला चढवला. शिवसेनेत पूर्वीचे शिवसैनिक राहिलेले नाहीत. यांची उडी कुठपर्यंत जाते ते पाहू. केंद्रात आमचीच सत्ता आहे, असे सूचक विधान राणेंनी केले.

 

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या, भाजपच्या या नेत्यानं साधला निशाणा

  खासदार मोहन डेलकर यांच्यानंतर शिवसेनेकडून दादरा नगर- हवेली लोकसभा पोटनिवडणुकीकरिता मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दादरा नगर- हवेली...

समीर वानखेडेच्या वडिलांचे नाव ‘दाऊद?? मालिकांनी दिला आणखी एक पुरावा

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. त्यातच एनसीबीचा पंच प्रभाकर साईल याने...

‘रेशनवरील धान्य तस्करी’ मंत्री छगन भुजबळ यांनी उचलली कठोर पाऊले

  रेशनवरील धान्य वितरणातील घोटाळ्यासंदर्भात अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यभरातील रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी,...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

Recent Comments