R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या भास्कर जाधव म्हणतात, नारायण राणेंना हा तर सिद्धपुरुषानं दिलेला शाप,

भास्कर जाधव म्हणतात, नारायण राणेंना हा तर सिद्धपुरुषानं दिलेला शाप,

 

शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेलं वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून राज्यभरात राणे विरोधात शिवसैनिकांनी आंदोला सुरु केले आहे. त्यातच आता शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केंद्रीय नारायण राणेंवर टीका केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सिद्धपुरुष होते. त्यांनी राणेंना शाप दिला होता. त्यामुळेच राणे काहीही बरळत आहेत, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे.

भास्कर जाधव यांनी मीडियाशी संवाद साधताना नारायण राणेंवर जोरदार टीका केली आहे. राणे असं का बडबडत आहेत? बाळासाहेब ठाकरे यांनी हयात असताना एका कामासाठी डॉ. जलील पारकर यांना फोन केला होता. पारकर अजून आहेत. त्यांच्या फोनवरूनच शिवसेनाप्रमुखांनी राणेंना दिलेला शाप होता. बाळासाहेब ठाकरे हे सिद्धपुरुष होते. ते जे बोलायचे ते जे भविष्यवाणी करायचे ती खरी व्हायची. बाळासाहेबांचं प्रत्येक वक्तव्य खरं ठरलेलं आहे. राणे केंद्रीय मंत्री होऊ द्या की आणखी काही होऊ द्या, सिद्धपुरुष बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला त्यांना शाप आहे, त्यानुसार राणेंची अधोगती सुरू आहे, असं जाधव म्हणाले.

पुढे बोलताना जाधव म्हणाले की, मी यापूर्वी अनेक वेळा सांगितलं राणे आणि त्यांचे दोन पुत्र. त्यांना पुत्रं म्हणायचं की आणखी काही म्हणयाचं हे तुम्ही ठरवा. हे तिघेही म्हणजे संपूर्ण कोकणाच्या संस्काराला लागलेला महाकलंक आहे. राणे आणि त्यांच्या मुलांची वक्तव्ये चुकीची आहेत. केंद्रीय मंत्री म्हणूनही राणेचं वक्तव्य संतापजनक आहे. यापूर्वीही त्यांनी घाणेरड्या भाषेत वक्तव्य केली आहेत, असं सांगतानाच राणेंनी कानाखाली मारेल म्हणून सांगितलं… ज्या पद्धतीने शिशुपालाचे शंभर गुन्हे झाले होते. त्याप्रमाणे राणेंचे हे शंभर गुन्हे पूर्ण झाले आहेत. महाराष्ट्राची माती, वैचारीक भूमिका राणेंना नेस्तानाबूत केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments