R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home शिक्षण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक ? नाशिकच्या दिशेने रवाना

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक ? नाशिकच्या दिशेने रवाना

 

भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेले विधान आता राणेंच्या अंगाशी आले आहे. भाजपने राणेंच्या वक्तव्याला समर्थन नसल्याचे सांगतानाच राणेंच्या पाठीशी उभा राहू असे स्पष्ट केले आहे. पण नारायण राणे यांच्या अटकेची प्रक्रिया ही रत्नागिरी पोलिसांकडून सुरू झाल्याची माहिती आहे.

मंत्री नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानेच रत्नागिरी पोलिसांकडून ही प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती आहे. त्याचवेळी राणेंनी मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. पण हायकोर्टानेही या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्यासाठी नकार दिला आहे. नाशिकमधून दाखल झालेला पोलिसांच्या पथकाकडून ही ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळेच रत्नागिरी पोलिसांनी ही कारवाई करत नारायण राणेंना अटक केली आहे.

नारायण राणे यांच्या अटकेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा संगमेश्वर येथे दाखल झाला आहे. संगमेश्वरच्या गोळवली येथे गेल्या एक ते दीड तासांपासून चर्चा सुरू आहे. पण या प्रकरणात नारायण राणे यांच्याकडून काही कायदेशीर गोष्टी पुर्ण करण्यासाठीचा खटाटोप पोलिसांकडून सुरू आहे. त्याचवेळी पोलिसांना आणि कार्यकर्त्यांना धक्काबुक्कीचे प्रकारही याठिकाणी निदर्शनास आले आहेत. तर दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी शिवसेनेकडून नारायण राणे यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments