R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याचा प्रयत्न ही महाविकास आघाडीची सूडबुद्धी"

“केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याचा प्रयत्न ही महाविकास आघाडीची सूडबुद्धी”

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याचा प्रयत्न ही सूडबुद्धी आहे, अशी खरमरीत टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी केली. नियम ध्यानात घेता राणे केंद्रीय मंत्री असल्याने त्यांना अटक करता येणार नाही तरीही कोकणात जन आशिर्वाद यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद रोखण्यासाठी राजकीय हेतूने अटक करण्याचे वातावरण निर्माण केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

पाटील म्हणाले की, मा. नारायण राणे यांनी काही बोलल्यानंतर त्याला विरोधक उत्तर देऊ शकतात. परंतु, एखाद्या वाक्याच्या आधारे केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याला थेट अटक करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे या राज्य सरकारच्या कायद्याच्या ज्ञानाबद्दलच शंका निर्माण करणारे आहे. महाविकास आघाडी सरकारने सातत्याने न्यायालयाकडून थपडा खाल्या आहेत, तशा या प्रकरणातही बसतील.

ते म्हणाले की, राणेसाहेबांची एक बोलण्याची शैली आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे. एखाद्या नेत्याने काही विधान केले तर त्याला उत्तर देण्याचा प्रघात आहे. लगेच गुन्हा दाखल करणे योग्य नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पंतप्रधानांना जाहीर सभेत चोर म्हणाले होते किंवा त्यांनी पक्षाच्या दसरा मेळाव्यात राज्यपालांवर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली होती. हे असे विषय काढले तर किती खटले दाखल करावे लागतील, याचा विचार करावा.

त्यांनी सांगितले की, भाजपाच्या नाशिकमधील कार्यालयावर झालेला हल्ला भ्याडपणाचा आहे. शब्दांची लढाई शब्दांनीच करावी. असे लांबून दगड मारणे भ्याडपणा आहे. राज्यात शिवसेनेच्या महाविकास आघाडी सरकारचे राज्य आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणे ही त्यांची जबाबदारी आहे. अशा प्रकारे शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपाच्या कार्यालयावर दगडफेक करणार असतील तर त्याची प्रतिक्रिया काय उमटेल याचा विचार करा, असा इशारा मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments