R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या पोलिसांना शिवीगाळ आणि अरे-तुरे करणे युवासेना सचिव वरुण सरदेसाईंना चांगलेच महागात पडणार

पोलिसांना शिवीगाळ आणि अरे-तुरे करणे युवासेना सचिव वरुण सरदेसाईंना चांगलेच महागात पडणार

 

मुंबई | भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शविसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत कानशिलात लगवण्याचे वक्तव्य केल्यामुळे राज्यातील राजकारण काल, मंगळवारी चांगलंच तापलं होत. राज्यातील अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी आक्रमक पावित्रा घेतला होता. तसेच मुंबईतही जुहू येथील नारायण राणे यांच्या बंगल्या जवळ शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले.

यावेळी छेडण्यात आलेल्या आंदोलनात युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे युवासेनेच्या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. या आंदोलनादरम्यान शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक, शिवगाळी सुरू केली. आंदोलन खूपचं चिघळले. परिस्थिती हात बाहेर जात असल्यामुळे पोलीस सर्व कार्यकर्त्यांना मागे जाण्यास सांगत होते. मात्र यावेळी वरुण सरदेसाई पोलिसांना शिवीगाळ करताना दिसले. त्यामुळे सध्या वरुण सरदेसाईंवर एफआयआर दाखल करा अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाकडून केली जात आहे.

वरुण सरदेसाई यांचा पोलिसांना शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होताना दिसत आहे. ABP माझा मराठी वृत्तवाहिनीवरील हा व्हिडिओ असून त्यामध्ये पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नात असताना वरुण सरदेसाई लाईव्ह सुरु असतानाच पोलिसांना शिवीगाळ करताना आहेत. त्यामुळे आता भाजयुमो मुंबईचे अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना यांनी पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी वरुण सरदेसाई यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

 

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments