R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया 'नारोबा राणे''यांच्यामुळे केंद्र सरकारची मान शरमेनं खाली"

‘नारोबा राणे”यांच्यामुळे केंद्र सरकारची मान शरमेनं खाली”

 

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्याआक्षेपार्ह वक्तव्या केल्यानंतर राज्यभरात शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते. त्यातच अनेक ठिकाणी यांचे पडसाद उमटलेले दिसून आले होते. यावेळी ठिकठिकाणी आंदोलनासह केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर गुन्हे दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणात नारायण राणे यांना रात्री उशीरा जामीन मंजूर झाला. याप्रकरणावर आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून यावर भाष्य करण्यात आले आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर टीका करत वाभाडे काढलेत. भोकं पडलेला फुगा, या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख लिहिण्यात आला आहे. तसंच नारायण राणे यांचा उल्लेख नारोबा राणे असा करण्यात आला आहे. काय आहे आजच्या सामनाच्या अग्रलेखात पंतप्रधान मोदी यांच्या मांडीस मांडी लावून बसणाऱ्या महात्मा नारोबा राणे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याची भाषा केली.

पंतप्रधानांच्या बाबतीत कुणं असं विधान केलं असतंतर त्यास देशद्रोहाच्या आरोपाखाली एव्हाना तुरुंगात डांबलेच असते. नारोबा राणे यांचा गुन्हा त्याच पद्धतीचा आहे. महाराष्ट्रात कायद्याचेच राज्य आहे व एका मर्यादेपलीकडे ही बेताल बादशाही खपवून घेतली जाणार नाही हे कृतीनं दाखवून द्यायची हीच वेळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हा बेतालपणा सहन करणार नाहीत. मुख्यमंत्र्यांवर हात टाकण्याची भाषा करणारा कोणीही असो त्यांचे हात सध्या तरी कायदेशीर मार्गानं उखडलेलेच बरे!. जामिनावर सुटका होताच नारायण राणेंची मोजक्याच शब्दात पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… पंतप्रधान मोदींना मारण्याचा नुसता कट रचल्याच्या (?) आरोपाखाली काही विचारवंतांना फडणवीस सरकारनं तुरुंगात सडवलेच आहे.

मात्र इथे तर नारोबा राणे यांनी केंद्राकडून मुख्यमंत्र्यांना मारण्याचीच सुपारी घेतल्याचं दिसत आहे. आता सुपारीबाजांची महाराष्ट्रात आरती ओवळायची काय? महात्मा नारोबांसारखे भाडोत्री लोक शिवसेनेवर सोडले जात आहेत. या भाडोत्रींनी भाजपलाच नागडे करुन सोडले व आता तोंड लपवून फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. केंद्रीय मंत्री नारोबा राणे यांनी शपथग्रहण केल्यापासून जे दिवे पेटवले व अक्कल पाजळली त्यामुळे केंद्र सरकारची मान शरमेनं खाली झुकली आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या, भाजपच्या या नेत्यानं साधला निशाणा

  खासदार मोहन डेलकर यांच्यानंतर शिवसेनेकडून दादरा नगर- हवेली लोकसभा पोटनिवडणुकीकरिता मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दादरा नगर- हवेली...

समीर वानखेडेच्या वडिलांचे नाव ‘दाऊद?? मालिकांनी दिला आणखी एक पुरावा

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. त्यातच एनसीबीचा पंच प्रभाकर साईल याने...

‘रेशनवरील धान्य तस्करी’ मंत्री छगन भुजबळ यांनी उचलली कठोर पाऊले

  रेशनवरील धान्य वितरणातील घोटाळ्यासंदर्भात अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यभरातील रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी,...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments