R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "पोलिसांना जरा बाजूला करा, राणेंचा कोथळा बाहेर काढेन" सेनेच्या या आमदाराचे वादग्रस्त...

“पोलिसांना जरा बाजूला करा, राणेंचा कोथळा बाहेर काढेन” सेनेच्या या आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य |

 

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त विधान केल्यानंतर भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर नाशिक पोलिसांनी अटकेची कारवाई करण्यात आली तसेच नंतर सोडण्यात आले होते. या प्रकरणामुळे नारायण राणेंच्या अटकेची शक्यता निर्माण झाल्यापासूनच राज्यातलं राजकारण तापलं. राणेंना जामीन मिळाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तर दुसरीकडे हिंगोलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख आणि कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांना राणेंबद्दल वादग्रस्त विधान केले आहे.

बुधवारी राज्यभरात शिवसैनिक राणेंविरोधात रस्त्यावर उतरले. हिंगोलीत नारायण राणेंचा फोटो कुत्र्याच्या गळ्यात लटकवून प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी तीव्र शब्दांत राणेंचा निषेध केला. राणेंवर टीका करताना आमदार संतोष बांगर यांची जीभ घसरली. त्यांनी राणेंचा एकेरी उल्लेख करत जोरदार टीका केली. नारायण राणेंचा कोथळा काढण्याची भाषा यावेळी बांगर यांनी केली.

‘अरे तू काय सांगतो, कुठं यायचं कुठं यायचं. तुझ्या घरात घुसून तुला मारण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. माझा पोलीस बंदोबस्त थोडा बाजूला करा. हा संतोष बांगर, शिवसेनेचा मावळा, छत्रपतींचा मावळा एकटा येऊन चारीमुंड्या चीत करेल. तुझा कोथळा बाहेर नाही काढला तर नाव सांगणार नाही,’ अशी अतिशय प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह टीका बांगर यांनी केली.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

क्रांती रेडकरने मौलानांचे दावे फेटाळले, ही माहिती आधी द्यायला हवी होती

  मुंबई | समीर वानखेडे यांचा पहिला निकाह लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी समीर मुस्लिम असल्याचा दावा केला. या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यावर...

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

क्रांती रेडकरने मौलानांचे दावे फेटाळले, ही माहिती आधी द्यायला हवी होती

  मुंबई | समीर वानखेडे यांचा पहिला निकाह लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी समीर मुस्लिम असल्याचा दावा केला. या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यावर...

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

Recent Comments