R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'करारा जवाब मिलेगा' राणेंना जामीनानंतरचे नितेश राणेंच ट्विट होतंय वायरल

‘करारा जवाब मिलेगा’ राणेंना जामीनानंतरचे नितेश राणेंच ट्विट होतंय वायरल

 

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवलं आहे. यामुळे मंगळवारी दिवसभर नारायण राणे अटक नाट्य आणि आरोप प्रत्यारोप सुरू होते. शेवटी मंगळवारी रात्री नारायण राणे यांना महाड न्यायालयाकडून दिलासा मिळाला. तासभर झालेल्या सुनावणीनंतर राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर नारायण राणे यांनी ‘सत्यमेव जयते’ असे ट्विट केले. अखेर सत्याचाच विजय झाला अशा आशयाचे ट्वीट नारायण राणेंकडून करण्यात आले.

आता त्या पाठोपाठ भाजप आमदार आणि राणेंचे सुपुत्र नितेश राणे यांनी देखील जामीन मिळताच ट्वीट करून शिवसेनेला इशारा दिला आहे. नितेश राणे यांनी मनोज वाजपेयीच्या एक चित्रपटातील व्हिडिओ शेअर करत शिवसेनेला त्यांनी इशारा दिला आहे. या व्हिडिओमध्ये मनोज वाजपेयी म्हणतोय की, ‘मगर आसमान में थुंकने वालों को शायद ये पता नही है, की पलटकर थुंक उन्ही के चेहरे पर गिरेगी. करारा जवाब मिलेगा. करारा जवाब मिलेगा.’ या ट्वीटमुळे नितेश राणे आता चर्चेत आले आहेत.

रायण राणे यांनी मुख्यमंत्रीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांच्यावर चार ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक पोलीस आयुक्तांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश दिले. दरम्यान, नारायण राणे हे संगमेश्वरच्या गोळवलीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यालयात उपस्थित होते. त्यावेळी त्या ठिकाणी ते दुपारचे जेवण करत असताना पोलीस त्याठिकाणी दाखल झाले. तसेच त्यांना तिथेच अटक करण्यात आली होती.

 

 

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

क्रांती रेडकरने मौलानांचे दावे फेटाळले, ही माहिती आधी द्यायला हवी होती

  मुंबई | समीर वानखेडे यांचा पहिला निकाह लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी समीर मुस्लिम असल्याचा दावा केला. या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यावर...

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

क्रांती रेडकरने मौलानांचे दावे फेटाळले, ही माहिती आधी द्यायला हवी होती

  मुंबई | समीर वानखेडे यांचा पहिला निकाह लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी समीर मुस्लिम असल्याचा दावा केला. या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यावर...

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

Recent Comments