R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या राणे यांना जमीन मिळाल्यानंतर फोन करून देवेंद्र फडणवीस म्हणाले की,

राणे यांना जमीन मिळाल्यानंतर फोन करून देवेंद्र फडणवीस म्हणाले की,

 

 

भाजप नेते आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांना महाड न्यायदंडाधिकाऱ्यांकडून काही अटींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत कानाखाली लगावण्याचं वक्तव्य केल्या प्रकरणी राणेंना अटक करण्यात आली होती. त्यानंतर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राणेंशी फोनवरुन संवाद साधला. भाजप पक्ष तुमच्या पाठीशी आहे, असा निरोप फडणवीसांनी राणेंना दिल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांनी दिली आहे.

रत्नागिरी पोलिसांकडून अटक होण्यापूर्वी नारायण राणेंनी रत्नागिरी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. तर मुंबई उच्च न्यायालयानेही या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिल्याने राणेंचा मुक्काम पोलीस ठाण्यात होणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, रात्री उशिरा महाड न्यायदंडाधिकाऱ्यांनी अटींसह जामीन मंजूर केल्यामुळे राणे यांना मोठा दिलासा मिळाला.

जामीन मंजूर करताना महाड कोर्टानं काही अटी घातल्या आहेत. राणे यांना १५ हजार रुपयाच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसंच त्यांना भविष्यात असं वक्तव्य करता येणार नाही. ऑडिओ चेक करण्यासाठी राणे यांना एकदा पोलीस ठाण्यात यावं लागणार आहे. त्यासाठी राणे यांना ७ दिवस आधी नोटीस दिली जाईल. त्याचबरोबर ३० ऑगस्ट आणि १३ सप्टेंबरला रायगड गुन्हे शाखेत हजेरी लावावी लागणार आहे. या दरम्यान, कागदपत्रे आणि पुराव्यांसोबत छेडछाड करता येणार नाही, असंही महाड कोर्टानं राणेंना बजावलं आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

नाशिक महानगर पालिका जिंकण्यासाठी संजय राऊतांची मोर्चेबांधणी सुरु

  नाशिक | नाशिक मनगर पालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ऑर्डर तयारी सुरु केली आहे तसेच इतर सर्वच राजकीय...

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

नाशिक महानगर पालिका जिंकण्यासाठी संजय राऊतांची मोर्चेबांधणी सुरु

  नाशिक | नाशिक मनगर पालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ऑर्डर तयारी सुरु केली आहे तसेच इतर सर्वच राजकीय...

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

Recent Comments