R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या स्वागताचे बॅनर अज्ञातांनी फाडले

मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या स्वागताचे बॅनर अज्ञातांनी फाडले

 

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर राणेंच्या स्वागताचे बॅनर जिल्ह्यात संपूर्ण हायवेवर लावण्यात आले आहेत. जिल्ह्याचे प्रवेशद्वार तसेच नॅशनल हायवेच्या दुभाजकावर मंत्री राणेंच्या स्वागताचे बॅनर भाजपा कार्यकर्त्यांनी लावले आहेत. हे बॅनर अज्ञाताकडून फाडण्यात आले आहेत. त्यामुळे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री राणेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक झाली आणि जामीनावर सुटकाही झाली. या घटनेनंतर राणे विरुद्ध शिवसेना असा सरळ संघर्ष संपूर्ण राज्यात पाहायला मिळाला. राणेंविरोधात आक्रमक होत राज्यात अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी राणेंचे बॅनर फाडले. याचे पडसाद कणकवलीत ही उमटले.

कणकवलीत शिवसैनिकांकडून राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याच्या प्रयत्नात असताना पोलीस आणि शिवसैनिकांत झटापट झाली. खासदार विनायक राऊत, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या बंगल्यावर सोडा वॉटरच्या बाटल्या फेकून हल्ल्याचा प्रयत्नही झाला. त्यानंतर आता खारेपाटण मध्येही राणेंच्या स्वागताचे बॅनरही अज्ञाताकडून फाडण्यात आले आहेत. सिंधुदुर्गात सध्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये या होणाऱ्या घटनांमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments