R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति महापालिकांमध्ये आता एक वॉर्ड, एक नगरसेवक होऊ शकतात पुढच्या वर्षी निवडणूका

महापालिकांमध्ये आता एक वॉर्ड, एक नगरसेवक होऊ शकतात पुढच्या वर्षी निवडणूका

मुंबई | २०२२ च्या सुरुवातीला मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिकसह १८ महापालिकांच्या निवडणुका एकल प्रभाग/वॉर्ड रचनेनुसारच होतील, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. त्यानुसार वॉर्डरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत. २०११ च्या लोकसंख्येच्या आधारे ही रचना करण्यात येणार आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीनंतर पुन्हा एकदा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे.

मुंबईत पूर्वीही एकल प्रभाग/वॉर्ड पद्धत होती. मात्र, अन्य महापालिकांमध्ये दोन, तीन किंवा चार वॉर्डांचा एक प्रभाग करून निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी राज्यात भाजपची सत्ता होती आणि या रचनेचा फायदा भाजपला होईल, असा अंदाज बांधून ती रचना करण्यात आली होती. मात्र महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर एकल प्रभाग/वॉर्ड रचनेच्या आधारे पालिका निवडणुका घेण्याचे ठरले.

त्याचप्रमाणे अधिनियमात तशी सुधारणादेखील केली. थेट नगराध्यक्ष व सरपंच निवडणुका फडणवीस सरकारच्या काळात घेण्यात आल्या. तो निर्णयही महाविकास आघाडी सरकारने बदलला व निर्वाचित सदस्यांमधून नगराध्यक्ष, सरपंचांची निवड करण्याचा निर्णय घेतला होता. पुढील वर्षी मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मीरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर उभा शंकराच्या मनपा निवडणूक पार पडणार आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

शिवसेना खासदार भावना गवळींना पुन्हा ईडीचे समन्स

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्र्यांना, खासदार आणि आमदारांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा मागे लागला आहे. त्यातच शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments