R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "सोमय्यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरू करावा" महेश तपासे यांची घणाघाती टीका

“सोमय्यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरू करावा” महेश तपासे यांची घणाघाती टीका

 

भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरू करावा, परंतु दुर्दैवाने तोही धंदा चालणार नाही कारण त्यांची भविष्यवाणी फोल ठरते, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर व कुटुंबावर किरीट सोमय्या यांनी ट्वीटद्वारे आरोप केले असून या आरोपांचा महेश तपासे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

अल जेब्रिया कोर्ट संदर्भात किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत आरोप केला आहे. मात्र या इमारतीचे मालक अर्शद सिद्दीकी यांनी या मालमत्तेच्या व्यवहारासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री छगन भुजबळ किंवा त्यांच्या कुटुंबाचा संबंध नाही असे स्पष्टीकरण दिले आहे असेही महेश तपासे म्हणाले. काही दिवसांपूर्वी सोमय्या यांनी शिवसेना खासदार भावना गवालियांच्यावर सुद्धा आरोप लगावला होता त्यावेळी आरोप करणाऱ्या सोमय्या यांच्या गादीवर शिवसेनिकांनी दगडफेक आणि शाईफेक केली होती.

दरम्यान, भाजप नेते वारंवार असे बेछूट आरोप करुन महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना बदनाम करत आहेत. राजकारण करावे परंतु वस्तुस्थिती काय आहे हे समजून आरोप केले तर उचित होईल. उगीचच नेत्यांना बदनाम करण्याचे कट-कारस्थान ताबडतोब थांबवावे, असा इशाराही महेश तपासे यांनी दिला आहे. आता तपासे यांच्या या टीकेला भाजपा काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments