R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया राणेंची संभाजी महाराजांशी तुलना, शिवसेना आमदाराची प्रमोद जठारांविरोधात तक्रार

राणेंची संभाजी महाराजांशी तुलना, शिवसेना आमदाराची प्रमोद जठारांविरोधात तक्रार

 

भाजपा नेते आणि केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी करण्यात आल्याने शिवसैनिक संतप्त झाले असून शिवसेना आमदार राजन साळवी यांनी या प्रकरणी भाजप नेते प्रमोद जठार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच जठार यांच्या अटकेची मागणीही केली आहे. त्यामुळे जठार यांना अटक होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नारायण राणे यांना अटक केल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. जन आशीर्वाद यात्रेचे संयोजक प्रमोद जठार यांनीही यावेळी घोषणाबाजी केली होती. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांसोबत अटक करण्यात आलेल्या नारायण राणेंची तुलना करण्यात आली होती. या प्रकरणी रत्नागिरी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. राणेंवर अनेक आरोप आहेत. त्यांची तुलना संभाजी महाराजांशी तुलना करणं चुकीचं आहे, असं शिवसेना आमदार राजन साळवी म्हणाले.

तसेच याप्रकरणी जठार यांना अटक केली जावी अशी आमची मागणी आहे, असंही त्यांनी सांगितलं. राणे यांनी कोकणात किती ही प्रयत्न केल तरी शिवसेना संपणार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: कोकणात शिवसेना रुजवलेली आहे. आम्ही राणे आणि त्याच्या पुत्रांना आम्ही किंमत देत नाही, असा हल्लाही त्यांनी चढवला.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘रेशनवरील धान्य तस्करी’ मंत्री छगन भुजबळ यांनी उचलली कठोर पाऊले

  रेशनवरील धान्य वितरणातील घोटाळ्यासंदर्भात अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यभरातील रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी,...

प्रदूषण थांबले नाही, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे पाण्याखाली जाईल !

  नवी दिल्ली | सध्याच्या गतीने ज्या प्रकारे कार्बन उत्सर्जन चालू आहे, ते तसेच चालू राहिले, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे पाण्याखाली जातील. ही शहरे...

‘राज्यातील काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर’ देवेंद्र फडणवीसांचा थेट आघाडी सरकारवर आरोप |

  मुंबई | दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

Recent Comments