R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या आपल्या हुजुरेगिरीला बावचळेले राऊत भोकं पडलेल्या फुग्याला का घाबरतायत? - गोपीचंद पडळकर

आपल्या हुजुरेगिरीला बावचळेले राऊत भोकं पडलेल्या फुग्याला का घाबरतायत? – गोपीचंद पडळकर

 

भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सामना अग्रलेखातून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. त्यातच आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. आपल्या हुजुरेगिरीमुळे बावचळेले संजय राऊत भोकं पडलेल्या फुग्याला का घाबरतायत? असं तर नाही ना की नारायण राणे यांचा फुगा तुमच्या विषयीच्या गुपितानं भरलाय?,” असा सवालही पडळकर यांनी ट्विट करून केला आहे.

“असं तर नाही ना की नारायण राणे यांचा फुगा तुमच्या विषयीच्या गुपितानं भरलाय? जो फुटला तर तिन्ही धन्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडेल. नारायण राणे यांच्यावरील सूडाची कारवाई ही कायद्याची कारवाई असं तुम्ही संबोधता. पण पोलिसांना आयाबहिणींवरून शिव्या देणाऱ्या वरूण देसाई यांना अटक का नाही केली? हेच का तुमचं महाराष्ट्र मॉडेल?,” असा सवालही पडळकरांनी केला.

“ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसी विचारांचा विरोध केला आणि शरद पवारांचं मार्मिक शब्दांनी पितळ उघडं केलं, पण तुम्ही आज त्यांचाच उदोउदो करताय. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसताय. हिंदू समाजाला सडलेला समाज म्हणणारा सर्जिल उस्मान उजळ माथ्यानं माहाराष्ट्रात फिरतो. त्याच्यावर तुम्ही कारवाई करत नाही. सत्तेच्या लालसेपोटी त्याच्यावर कारवाई करताना तुमचे हात थरथर कापतायत,” असा आरोपही त्यांनी केला.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments