R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'योगींनी शिवाजी महाराजांचा केलेला अपमान राणेंना पटला असेल'

‘योगींनी शिवाजी महाराजांचा केलेला अपमान राणेंना पटला असेल’

 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाच वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांचा अपमान केला होता. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. पाच वर्ष जुना तो विषय आहे. शिवाजी महाराजांचा अपमान भाजपमध्ये गेलेल्यांना पटला असेल, पण आम्हाला तो पटलेला नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे.

संजय राऊत यांचं मुंबई विमानतळावर आज सकाळी प्रतिक्रिया दिली होती. पुढे नारायण राणे यांच्याबाबत प्रतिक्रिया देताना राऊत पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत आता कोण काय बोललं, मला माहिती नाही. मुख्यमंत्री ठाकरे यांनी योगींबद्दल केलेलं वक्तव्य जुनं आहे. पाच वर्षांपूर्वीचं ते प्रकरण आहे. ते आता उकरून काढण्याची काय गरज, आज टीका करणारे त्यावेळी झोपले होते का, असा प्रश्न राऊत यांनी विचारला. आता कुणी काय बोललं

“योगींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याची प्रतिक्रिया म्हणून ते वक्तव्य होतं. त्यांनी महाराजांचा अपमान केला होता. भाजपमध्ये गेलेल्यांना ते पटलं असेल, पण आम्हाला ते पटलेलं नाही. असं संजय राऊत राणे यांचं नाव न घेता म्हटलं आहे. कॅबिनेटचे एक मंत्री म्हणजे केंद्र सरकार नव्हे. आम्हाला केंद्राशी संवाद साधायचा असेल तर आम्ही थेट मोदी-शाह यांच्याशी करू, असंही राऊत यांनी म्हटलं.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

Recent Comments