R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "भाजप फार महान पक्ष, परग्रहावरील लोकांवरही गुन्हा दाखल करू शकतो"

“भाजप फार महान पक्ष, परग्रहावरील लोकांवरही गुन्हा दाखल करू शकतो”

मुंबई | मुखपत्रातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. भोकं पडलेला फुगा, असा टोला शिवसेनेने राणे यांना लगावला होता. याप्रकरणी सामना वृत्तपत्राच्या संपादक रश्मी ठाकरेंविरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने तक्रार दाखल केली होती. आता या प्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी थेट भाजपाला इशारा दिला आहे.

सामनाचा मी कार्यकारी संपादक आहे. त्या अग्रलेखाची जबाबदारी हा संजय राऊत घेतोय’, असं राऊत यांनी बोलून दाखविले होते. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात अपशब्द वापरल्यामुळे भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून संजय राऊत यांनी भाजपचा समाचार घेतला आहे. भाजप हा फार महान पक्ष आहे. ते परग्रहावरील लोकांवरही गुन्हा दाखल करू शकतात, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे.

संजय राऊत यांनी भुवनेश्वरहून आल्यानंतर मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपची खिल्ली उडवली. भाजप कुणावरही कारवाई करू शकतो. इतका महान पक्ष आहे तो. तो परग्रहावरील लोकांवरही गुन्हे दाखल करेल. त्यांच्या हातात यंत्रणा आहे. ते काही करू शकतात, असा हल्ला राऊत यांनी चढवला होता. आता भाजपवर केलेल्या टीकेचा पक्षाचे नेते कसा समाचार घेतायत हे पाहावे लागणार आहे,

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments