R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया काही जुने व्हायरस परत आलेत, त्यांचाही बंदोबस्त करायचाय मुख्यमंत्री ठाकरे यांनी लगावला...

काही जुने व्हायरस परत आलेत, त्यांचाही बंदोबस्त करायचाय मुख्यमंत्री ठाकरे यांनी लगावला राणेंना टोला

 

मुंबई | भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातला संघर्ष काही संपणार नसल्याचं दिसतंय. नारायण राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत शिवसेनेला इशारा दिल्यानंतर आज शिवसेनेने ‘सामना’तून राणेंविरोधातील जुन्या प्रकरणांची चौकशी करण्याचा इशारा दिला. दरम्यान, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता नारायण राणे यांना जोरदार टोला लगावला होता.

मुख्यमंत्री म्हणाले की, “अजूनही थोडे दिवस थांबायला पाहिजे, कोरोनाचं संकट खरंच गेलं आहे का? पूर्ण गेलेलं नाही, अजूनही आहे. काय काय तर जुने व्हायरस परत आले आहेत. ते पण दिसतंय.आणि जुने व्हायरससुद्धा कारण नसताना साईड इफेक्ट त्याच्यामध्ये आणतायत. तर त्या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आह, त्या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे,” असं मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर निशाणा साधला. “सगळ्यांना फिरणं आवडतं. काही जणांचं राजकीय पर्यंटन असतं इथून तिथे आणि तिथून इथे. काहीजण प्रवासी असतात, ते वेगवेगळी ठिकाणं बघत असतात. मधल्या काळामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतली होती. त्यावेळी एक शब्द वापरला होता ‘रिवेंज टुरीझम’. त्यांचं असं म्हणणं होतं की जरा सावधता बाळगा, पर्यटन स्थळावर एवढी गर्दी होत आहे की पुन्हा हे संकट येऊ शकतं,” असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह २०२१’ च्या कार्यक्रमात बोलत होते.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘रेशनवरील धान्य तस्करी’ मंत्री छगन भुजबळ यांनी उचलली कठोर पाऊले

  रेशनवरील धान्य वितरणातील घोटाळ्यासंदर्भात अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यभरातील रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी,...

प्रदूषण थांबले नाही, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे पाण्याखाली जाईल !

  नवी दिल्ली | सध्याच्या गतीने ज्या प्रकारे कार्बन उत्सर्जन चालू आहे, ते तसेच चालू राहिले, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे पाण्याखाली जातील. ही शहरे...

‘राज्यातील काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर’ देवेंद्र फडणवीसांचा थेट आघाडी सरकारवर आरोप |

  मुंबई | दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments