R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या महाविकास आघाडीचे नेते आणि राज्यपालांची भेट झाली रद्द!

महाविकास आघाडीचे नेते आणि राज्यपालांची भेट झाली रद्द!

 

मुंबई | विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा रखडला आहे. त्यावरुन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार होते. संध्याकाळी ६ वाजता महाविकास आघाडीचे नेते राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार होते.

मात्र, आज होणारी ही भेट रद्द झाल्याची माहिती मिळतेय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना सांगितलं होतं की, राज्यपाल कोश्यारी यांनी आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावर भेटण्यासाठी बोलावलं आहे. त्यानुसार आज ही भेट होणार होती. मात्र आता ही भेट होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

राज्य सरकार माझ्याकडे १२ सदस्यांच्या नियुक्तीचा आग्रह धरत नाही. तुम्ही का आग्रह धरता?; असा सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काँग्रेस नेत्याला केला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मुद्द्यावरून राज्यपालांवर टीका केली होती. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर भाष्य केलं आहे. मी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांना भेटणार आहे, असं अजित पवार यांनी आज स्पष्ट केलं.

अजित पवार यांनी २० ऑगस्ट रोजी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या मुद्द्यावरून राज्यपालांनी केलेल्या विधानाबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिलं होतं. राज्यपालांवर मला बोलण्याचा अधिकार नाही. पण पुढच्या आठवड्यात मी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना जाऊन भेटणार आहोत, असं अजित पवार म्हणाले होते.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments